कोरोना काळात लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी
५ महत्त्वाच्या टिप्स

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लाँकडाऊनमुळे बंदिस्त जीवन जगणार्‍या लोकांच्या मानसिक आरोग्याबरोबरच लैंगिक आरोग्यावरही विपरीत परिणाम झालेला आहे. लोकांच्या लैंगिक आरोग्यामध्ये सुधारणा होण्यासाठी काही गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक आहे.

१) बेडरूममध्ये नवीन गोष्टी वापरून पहा

लॉक डाऊन मध्ये दैनंदिन जीवनक्रमाबरोबरच कामजीवन ही कंटाळवाणे बनले आहे. कामजीवनातील रटाळपणा दूर करण्यासाठी लैंगिक संबंधाच्या वेळी नवीन व मनोरंजक संकल्पनांचा वापर करून कामजीवनात नाविन्यता आणणे शक्य होईल. त्यासाठी सेक्स करताना पती पत्नीने नवीन पोझिशन्स चा वापर करायला हवा. पती-पत्नीने सेक्स करताना बेडरूम बरोबरच इतर ठिकाणांचा वापर करावा. त्यामध्ये बाथरूम लिविंग रूम किंवा किचनचा ही वापर करता येणे शक्य होईल. तसेच लैंगिक संबंधाच्या वेळी नवीन मादक अंतर्वस्त्रांचा वापर करून कामजीवनातील आनंद द्विगुणीत करता येईल.

२) मानसिक ताण-तणाव दूर करण्यासाठी प्रयत्न करा

कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरातील लोक प्रचंड दहशतीखाली जीवन जगत आहेत.त्यामुळे लोकांच्या मनावरील ताणतणाव वाढत चाललेले आहेत. लोकांच्या मनात केवळ कोरोनाविषयीची चिंता व्यापून राहिलेली आहे. त्यामुळे त्यांना कामजीवनाचा आनंद लुटणे हे देखील कठीण बनले आहे. त्यामुळे मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी ध्यान, प्राणायाम, योगा व श्वसनांचे व्यायाम प्रकार इत्यादींचा वापर करावयास हवा. तसेच शारीरिक व्यायाम प्रकारही करावयास हवेत. कोरोनाविषयी चिंता वाढवणाऱ्या बातम्या पासून दूर राहण्यासाठी स्वतःला टीव्हीवरील बातम्या व सोशल मीडिया यापासून दूर ठेवावयास हवे.

३) नियमितपणे प्रणयक्रिडा करा

लॉकडाऊन काळात दैनंदिन कामकाजात पती-पत्नी एकमेकांना मदत करायला हवी. एकमेकांच्या सानिध्यात अधिक राहण्याबरोबरच रिकाम्या वेळी प्रणयक्रिडा किंवा प्रणय चेष्टा करायला हवी. तसेच पती-पत्नींनी बाथरूम मध्ये एकत्रित अंघोळ करून प्रणयक्रिडांमध्ये अधिक भर घालायला हवी. प्रणयक्रीडा करताना प्रत्येक वेळी सेक्स करायलाच हवा असे नाही. नियमितपणे प्रणयक्रिडा केल्यास पती-पत्नीची लैंगिक इच्छा वृद्धिंगत होण्यास मदत होते.

४)घरी प्रणयरम्य संध्याकाळ साजरी करा

सध्या लॉकडाऊन मुळे हॉटेल्स, चित्रपटगृहे व मॉल्स बंद असल्यामुळे पती-पत्नींना एकत्रितपणे रोमॅंटीक संध्याकाळ घालवण्याची कल्पना अंमलात आणता येत नाही. मात्र त्यासाठी पती-पत्नींनी आठवड्यातील एक दिवस घरीच प्रणयरम्य संध्याकाळ साजरी करायला हरकत नाही. त्यासाठी खास रेस्टॉरंट मधून आवडत्या जेवणाची ची ऑर्डर पार्सलद्वारे मागू शकता. त्यापूर्वी नवीन आकर्षक वस्त्र परिधान करून संध्याकाळी आवडत्या संगीताच्या तालावर शक्य असल्यास ड्रिंक्सचा आस्वाद घेत विविध काम क्रीडा प्रकार करू शकता.

५) संभोगोत्तरर प्रणयक्रिडेकडे दुर्लक्ष करू नका

लैंगिक संबंधानंतर कामपूर्ती झाली की पुरुषाचे बऱ्याच वेळा संभोगोत्तर प्रणयक्रीडेकडे दुर्लक्ष होते. संभोगोत्तर प्रणयक्रिडे मध्ये पती-पत्नी एकमेकांना बाहुपाशात घेऊन स्पर्शाचा अधिकाधिक वापर करावयास हवा. पती-पत्नी काहीवेळ एकमेकांशी आपुलकीने संभाषण करीत राहिल्यास त्यांच्यामध्ये भावनिक गुंतवणूक वाढत जाते. त्यामुळे दोघांचीही लैंगिक इच्छा वाढून पती-पत्नींच्या नात्यामधील वीण अधिकच घट्ट बनत जाते.

अशा रीतीने कोरोना काळात पती-पत्नींनी या ५ गोष्टींचा अवलंब केल्यास त्यांच्या लैंगिक आरोग्यामध्ये सुधारणा होण्यास निश्चितच मदत होईल.

- डॉ. राजसिंह सावंत
लैंगिक समस्यातज्ज्ञ, कोल्हापूर